दिनचर्या (AYURVEDA STANDARD DAILY ROUTINE)

स्वास्थ्य संरक्षणासाठी दिनचर्या
1. ब्रह्ममुहांत उठणे :सूर्यादया पूर्वी उठायला पाहिजे, यावेळी वातावरण प्रदूषण रहित असते. प्राणवायुची (आक्सीजन) मात्रा सर्वाधिक असते. सकाळच्या वातावरणात आपल्या शरीरात उपयोगी रसायने सवित होता. त्याने शरीरात ऊर्जा व उत्साह यांचा संचार होतो.
2. उपः पान– सकाळी उठल्यानंतर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतातः पाचन संस्था नियमित राहते, वेळेपूर्वीच केस पांढरे होगे व चेहऱ्यावर सुरकुत्या येणे थांबते.
3. इंश स्मरण ध्यान – याने मन एकाग्रचित होते, मानसिक व शारीरिक तनाव दूर होतात. तनावमुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक व्याधी होत नाहीत. ध्यानासाठी ईश स्मरण किंवा इष्ट गोष्टीचे ध्यान करायला हवे.
4. मल-मूत्र उत्सर्जन – शरीरामध्ये चयापचय (Metabolism) च्या मुळे बनलेले अवशिष्ट व विषारी तत्व उत्सर्जन क्रिये द्वारा, शरीराबाहेर टाकले जातात. प्रात:काली ही क्रिया केल्याने पूर्ण दिवस शरीरामध्ये हलकाई असते. या क्रियेनंनर हात व पाय चांगल्या प्रकारे साफ करावेत ज्यामुळे संक्रमणाचे भय राहणार नाही.
5.दांत धावन-जिह्वा निर्लेखन – यानी दांत स्वच्छ व मजबूत होतात. मुख दुर्गन्धी व विरसता यांचा नाश होतो. जिहवा स्वच्छ व मलरहित होते व रसज्ञान चांगल्याप्रकारे होते.
6. मुखादिधावन – लोध, आमलक आदि पाण्यात उकळून त्या पाण्याने मुखय ने प्रक्षालन करावे यामुळे मुखाची स्निग्धता दूर होते, फोड सुरकुत्या आदि होत नाहीत. चेहरा कांतिमय बनतो नेत्र ज्योती वाढते.
अंजन -अंजन घातल्याने नेत्र स्वच्छ होतात, नेत्र ज्योती वाडते, नेत्रोग नाहीसे होतात. नेत्र सुन्दर व आकर्षक होतात.
8. नस्य
नस्य रोज सकाळी 2-3 बैंब गरम करून थंड केलेले तिळाचे तेल अथवा मोहरी तेल नाकात टाकावे, नाकात तेल टाकल्याने, शिर, नेत्ररोंग होत नाहीत.
9.अभ्यंग-स्नानापूर्वी शरीरावर तेलाने मालिश करावी याने त्वचा कोमल,कांतीयक्त व रोगरहित होते, त्वचेमध्ये रक्तसंचार वाढते, विषारी तत्व शरीराबाहेर निघतात व त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत.
10. व्यायाम – सूर्य नमस्कार, ऐरोबिक्स, योग वा अन्य दैनिक व्यायामाने शारीरिक सामर्थ्य व रोगप्रतिरोधक क्षमता वाढते. शरीरातीत समस्त स्रोतसांची शुदधी होते.
रक्तसंचार वाढतो, अवशिष्ट पदार्थ शरीराबाहेत निघतात, अतिरिक्त मेन कमी होतो.
11. क्षौर कर्म – वेळच्यावेळी दाढी-मिशा कापणे, केस विंचरणे, नखे कापणे. यामुळे त्वचा स्वच्छ राहते व प्रसन्नता येते. शरीरात लधुता येते व ऊर्जेचा संचार होतो, नखाद्वारे होणाऱ्या संक्रमणाचे भय राहत नाही.
12. उद्वर्तन (उटणे)-सुगन्धित द्रव्यांचा लेप किवा उदवर्तन करण्याने शरीराची दुर्गन्धी दूर होते.मनामध्ये प्रसन्नता व स्फूर्ती येते, उदवर्तननाने शरीरातील अतिरिक्त वसा कमी होते. शरीराचे अवयव स्थिर व हद होतात, त्वचा मुलायम व सुकुमार होते, त्वचेचे रोग, फोडे, सुरकुत्या आदि होत नाहीत.
13. स्नान – स्नान दैनिक स्वास्थ्यासाठी अत्यावशक आहे. स्नानाने शरीराच्या सर्वप्रकारच्या अशुदधी दूर होतात, यामुळे गाढ झोप येते, शरीरातील अतिरिक्त उष्मा, दुर्गन्ध, घाम, खाज व तृष्णा यांचा नाश होतो, शरीरातील समस्त ज्ञानेन्द्रिय सक्रिय होतात, रक्ताचे शोधन होते. भूख वाढते.
14. निर्मल वस्त्र धारण-स्वच्छ व आरामदायक कपड़े घातल्याने सुन्दरता, प्रसन्नता व आत्मविश्वास यांची वृद्धि होती,
15. आतप-ऊन्हापासून संरक्षण – अंगावर सरळ पडणाऱ्या सूर्यकिरणांपासून वाचावे. अशा सूर्यकिरणांशी त्वचा अधिक सम्पर्क आल्यास त्वचेमध्ये विभिन्न विकार होऊ शकताता. छत्री, स्कार्फ किंवा सनस्क्रीन लोशन यांचा वापर हितकर आहे.
16. निद्रा-ग्रीष्म ऋतुशिवाय इतर सर्व ऋतुंमध्ये रात्रि 6-8 तास झोप आवश्यक आहे.
ग्रीष्म ऋतु रात्रिशिवाय दिवसापण 1-2 तास आराम करायला हवा कारण अधिक उष्णतेने शरीरातील जलांश व शक्तिचा हास होतो व दिवसा झोप घेतल्याने त्यांची पूर्ती होते. शरीरात नवीन ऊर्जेचा संचार होतो. निद्रा शरीराच्या सम्यक वृद्धी व विकासासाठी आवश्यक आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top