ऋतुचर्या (AYURVEDA STANDARD SEASONAL ROUTINE)

हेमन्त ऋतुचर्या
काळ-मार्गशीर्ष, पौष (डिसेंबर-जानेवारी )
संभावित रोग– वात रोग, वात-कफज रोग, पक्षाघात, दमा, पायात भेगा पडणे, सर्दी.
पथ्य आहार-विहार (काय सेवन करावे?
1. शरीर संशोधनासाठी वमन व कुचल करावे.
2. स्निग्ध, गोड, जड,खारट भोजन करावे.
3. तूप, तेल तथा डिंक, मेथीचे लाडू, च्यवनप्राश, नवे तांदूळ, मांस आदिचे सेवन हितकारी आहे.
4.अभ्यंग, उटणे, कोमट जलाने स्नान, उष्ण गरम कपड्यांचा वापर, डोकं, कान, नाक, पायाचे तळवे यांना तेलाने मालिश करावे,गरम व गडद रंगाची वस्त्रे धारण करावीत, शेकोटी आणि ऊन्हाने शेक घेणे आदि हितकारी आहे.
5. हाथ व पाय धुण्यासाठी कोमट जलाचा उपयोग करावा. बूट, मोजे, हात मोजे टोपी, मफलर, स्कार्फ यांचा उपयोग करावा.
अपथ्य आहार-विहार (काय सेवन करू नये?) 
1.थंड, वात वाढवणाऱ्या वस्तुंचे सेवन, उपास व खूप द्रव पदार्थांचे सेवन कर नये.
2. दिवसा झोपू नये, अधिक हवेशीर जागी राहणे तसेच थंड हवा हानिकारक आहे उघड्या पायांनी राहू नये तसेच फिके, पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करु नयेत.
शरद ऋतुचर्या
काळ-अश्विन-कार्तिक (ऑक्टोंबर-नोव्हेंबर)
ऋतु स्वभाव– पित्त प्रकोप, वात प्रशम
 संभावित रोग – शरीरात अग्निचे प्रधान कारण पित्त आहे. त्यामुळे ज्वर, रक्तविकार, दाह, छर्दि, शिर:शूल, चक्कर येणे, आंबट ढेकर येणे, दाह, रक्त व कफ विकार, तहान, मलावष्टंभ, अपचन, अरूचि आदि विकार होण्याची शक्यता असते, या ऋतुमध्ये विशेषत्वाने पित्तप्रकृतिच्या व्यक्तिंना विशेष त्रास होतो.
पथ्य आहार-विहार (काय सेवन करावे?)
1.हलके जेवण व पोट साफ ठेवणे हितकर आहे.
2. मधुर, शीतल, कडू (कडूनिंब, कारले आदि) भात, यवाचे, सेवन करावे.
3.कारले, पडवळ, मेथी, पालक, मूळा, श्रृंङगारक, द्राक्षे, टोमॅटो, फळांचा रस, सुका मेवा,नारळ यांचा प्रयोग करावा.
4.विलायची, मनुके, खारीक, तूप यांचा आवजन करावा
5. त्रिफला चूर्ण, बहाव्याची मज्जा, डाळ, मसाला रहित भाजी, गरम पाण्यासोबत, लिंबूरस सेवन, प्रात:काल वरात्रि हरीतकीचा वापर विशेष लाभदायक आहे.
6. तेल मालिश, व्यायाम तसेच प्रातः:भ्रमण, शीतल जलाने स्नान करावे हल्के वस्त्र धारण करावे, रात्री चन्द्रकिरणांचे सेवन करावे, चन्दन आणि मुलतानी मातीचा तेल लाभदायक आहे.
अपथ्य आहार-विहार ( काय सेवन करू नये?) 
1.मैद्याने बनवलेले पदार्थ, उष्ण, तिखट, जड, मसालेदार तसेच तळलेले खाद्य पदार्थ खाऊ नयेत.
2.दही व मासे खाऊ नयेत, पेरू रिकाम्या पोटी खाऊ नये, कन्द, शाक, वनस्पती तूप, शेंगदाणे, कच्ची काकडी, भाजलेल्या मक्याचे कणीस आदिचा अधिक उपयोग करुनये.
3.दिवसा झोपू नये, तोंड झाकून नये तसेच उन्हापासून संरक्षण करावे.
वर्षा ऋतुचर्या
काळ-श्रावण, भाद्रपद(ऑगस्ट, सप्टेंबर)
संभावित रोग– भूख कमी लागणे, सांधेदुखी, संधिशोथ, शोथ, फोड, खरूज पोटात जन्त, नेत्राभिष्यन्द (डोळे येणे), मलेरिया, टाइफाइड़, अतिसार, आणि अन्य रोग होण्याची संभावना असते.
पथ्य आहार-विहार (काय सेवन करावे?)
1.आंबट, खारट, स्नेहयुक्त जेवण, जुने धान्य (तांदुळ, जव, गहू)तसेच मांसरस, तूप व दूधाचा वापर, भोपळा, वांगी, पड़वळ, कारले, आले, जीरा, मेथी लसूण यांचे सेवन हितकर आहे.
2. शुद्ध पाण्याचा उपयोग करावा, विहिर, तलाव आणि नदीच्या पाण्याचा उपयोग शुदध केल्याशिवाय करू नये, पाणी उकळून वापरणे श्रेष्ठ आहे.
3. पावसात भिजू नये. भिजल्यास लगेच कोरड़े कपड़े घालावेत, पादत्राणे शिवाय ओल्या मातीत किंवा चिखलात यामध्ये जाऊ नये, दमट जागी राहू नये तसेच बाहेरून आल्यानंतर पाय धुवून पुसून ध्यावेत.
4. तेलाने मालिश करणे हितकर आहे. कीड़े, पतंग व डास यांच्यापासून वाचण्यासाठी मच्छरदाणी चा प्रयोग करावा.
अपथ्य आहार-विहार (काय सेवन करू नये?)
1. भात, बटाटा, भेंडी, तसेच पचण्यास जड़ आहारद्रव्यांचा प्रयोग, शिळे अन्न, दही, मांस, मासे, अधिक द्रव पदार्थ, मद्य आदिंचे सेवन अहितकर आहे. तसेच तलाव व नदीच्या पाण्याचे सेवन योग्य नाही.
2. दिवस झोपणे, रात्री जागरण करणे, उघड्यावर झोपणे, अधिक व्यायाम, आतपसेवन, अधिक परिश्रम अधिक मैथन, अज्ञात नदी, जलाशय आदि मध्ये स्नान तथा पोहणे अहितकर आहे.
ग्रीष्म ऋतुचर्या
काळ-ज्येष्ठ, आषाढ( जून, जुलै)
संभावित रोग-रूक्षता, दौर्य, उष्माघात, कॉलरा, कांजण्या, उल्टी, अतिसार ज्वर, नासागत रक्तस्राव, दाह, तृष्णा, कावीळ, यकृत विकार आदि होण्याचि शक्यता असते.
पथ्य आहार-विहार (काय सेवन करावे?)
1. लघु, मधुर, स्निग्ध, थंड पदार्थ, भात, जवस, मूग, मसूर, दूध, सरबत, दह्याची लस्सी, फळांचा रस, सात, ताक आदि, संत्री,डाळिंब, लिंबू, टरबूज, खरबूज, उस, नारळाचे पाणी, जलजीरा. कांदा, कैरी आदिंचा प्रयोग हितकर आहे.
2. सूर्योदयापूर्वी उठणे व उप:पान करणे हितकर आहे.
3.सकाळी फिरणे, दोन वेळा स्नान, थंड जागी राहणे, ऊन्हात जाण्यापूर्वी पाणी पिणे तसेच डोके झाकणे, वारंवार पाणी पीत राहेण. सुगन्धित द्रव्यांचा प्रयोग, तसेच दिवसा झोपणे चांगले आहे.
अपथ्य आहार-विहार ( काय सेव करू नये?)
1. न, परिश्रम, व्यायाम, मैथुन, तहानलेलं राहणे, रेशमी कपड़े, कृत्रिम सौंदर्य प्रसाधने, प्रदूषित जल सेवन, अहितकर आहे.
2. उष्ण, तिखट, चमचमीत, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, मैदा, बेसन, पासून, बनवलेले, पचण्यास जड़ पदार्थाचे अधिक मात्रेत सेवन, मद्यपान करणे अहितकरण आहे.
शिशिर ऋतुचर्या
काळ-माघ, फाल्गुन ( फेब्रुवारी, मार्च)
संभावित रोग-अधिक भूख लागते, ओठ, त्वचा फोटो लागतात, सर्दी, रुक्षता, पक्षाघात, ताप, कास, दमा आदि रोगांची संभावना वाढते.
पथ्य आहार-विहार (काय सेवन करावे?)
1. विविध प्रकारचे पाक व लाडू, आलं, लसणाची चटनी, पोषक आहार आदि सेवन करावे.
2. दूधाचे आवर्जून सेवन करावे..
3. तेल मालिश, आतपसेवन, उष्ण जलाचा उपयोग करावा.
4. लोकरीचे व गडद रंगाचे कपड़े, बूट-पायमोजे आदिनी शरीर झाकून थेवावे.
अपथ्य आहार-विहार (काय सेवन करू नये?) 
1. बोचऱ्या थंड वाऱ्या पासून संरक्षण करावे.
2. लघु, वृक्ष व वायू वर्धक आहार घेऊ नये.
वसन्त ऋतुचर्या
काळ-चैत्र, वैशाख (एप्रिल,मे)
संभावित रोग-दमा, खोकला, अंगदुखी,ज्वर, अरूचि, मळमळ होने, बेचैनी गुरुता, भूक न लागणे, पोटात गुडगुड होने, मलावष्टंभ, पोटदुखी, पोटात जन्त होणे आदि विकार होतात.
पथ्य आहार-विहार (काय सेवन करावे?) जुने अन्न, गहू, ज्यारी, बाजरी, मका आदि धान्यांचा आहार श्रेष्ठ आहे. म मसूर, हरभरा दाळ, तसेच मूळा, गाजर, पडवळ, मेथी, पालक, धने आदिंचे सेवन हितकारी आहे.
2.वमन, जलनेति, नस्य आणि कुंजल आदि हितकारी आहेत.
3.परिश्रम व्यायाम, उटणे लावणे, डोळ्यांत अंजनाचा प्रयोग करणे हितकर आहे.
4.शरीरावर चन्दन,अगरु आदिंचा लेप लाभदायक आहे.
5.मधासोबत हरितकी, सकाळच्या हवेचे सेवन, सूर्योदयापूर्वी उठून योगासन करणे, अभ्यंग करणे फायदेशीर आहे.
अपथ्य आहार-विहार (काय सेवन करू नये?) 
1.नवीन अन्न, थंड व स्त्रिम्धतायुक्त,खुप आंबट व गोड आहार द्रव्य, दही, उडीद, बटाटा कांदा, ऊस.नवीन गुळ,म्हशीचे दूध आदिंचे सेवन अहितकर आहे.
2.दिवसा झोपणे, एकाच जागी खूप वेळ बसणे अहितकर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top